
अतिवृष्टीचा एसटी विभागाला फटका ,मोठे आर्थिक नुकसान
गेले काही दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून रस्ता खचणे ,मातीचे ढिगारे रस्त्यावर येणे झाडे पडणे व विविध भागात पाणी भरणे या कारणामुळे एसटी वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्यातील काही विभागात एसटीची वाहतूक थांबवावी लागली होती तर अनेक भागात एसटीच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. एसटी विभागाच्या रत्नागिरी शहर व ग्रामीण भागाला त्याचा आर्थिक फटका बसला आहे. एसटीच्या जवळजवळ सतराशे फेरर्या रद्द कराव्या लागल्यामुळे अंदाजे सत्तावीस लाखांच्या उत्पन्नाला एसटी विभागाला मुकावे लागले आहे. अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे पुरेशी प्रवासी नसणे व रस्त्यांच्या अवस्थेमुळे एसटी गाड्यांचे नुकसान होत असल्याने त्याचाही फटका एसटी विभागाला बसला आहे.
www.konkantoday.com