
रत्नागिरी माळनाका येथील स्कायवॉकचे दोन पत्रे उडाले
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरात पादचारी व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी माळनाका येथे बांधण्यात आलेल्या स्कायवॉकचे दोन पत्रे उडाल्याची घटना घडली आहे. माळनाक्यामधून विद्यार्थ्यांना क्रॉसिंग करताना अडचणी येत होत्या व अपघात होत होते म्हणून माळनाका येथे दीड कोटी रुपये खर्च करून हा स्कायवॉक उभा करण्यात आला आहे. गेले काही दिवस शहरात मोठ्या प्रमाणावर वादळी वारे वाहत असून आज सकाळी या स्कायवॉकचे दोन पत्रे उडून स्कायवॉकवर पडले. सुदैवाने त्यावेळी विद्यार्थ्यांची ये-जा नसल्याने अनर्थ टळला.
www.konkantoday.com