
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निकालासाठी संकेतस्थळ
रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाकडून आपल्याला उद्या निकालासंबंधीची माहिती वेळोवेळी दिली जाणारच आहे. तरीही राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने https://results.eci.gov.in/index1.html हे संकेतस्थळ तयार केले आहे. निकालाच्या दिवशी म्हणजेच उद्या शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजेपासून हे संकेतस्थळ कार्यान्वित होणार आहे.
या संकेतस्थळावर निकालाची माहिती मिळणार आहे. अधिकृत निकालासाठी सर्वांनी या संकेतस्थळाचा उपयोग करावा, ही विनंती.*जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी*