नागरकोईल-गांधीधाम २६ पासून धावणार एलएचबी डब्यांची
कोकण मार्गावरून धावणार्या नागरकोईल-गांधीधाम साप्ताहिक एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. २६ नोव्हेंबरपासून एक्सप्रेस २२ एलएचबी डब्यांची धावणार आहे. यापूर्वी एक्सप्रेस २३ डब्यांची धावत होती.एक्सप्रेसला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने डब्यांच्या संरचनेत रेल्वे प्रशासनाने बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार २६ नोव्हेंबरपासून तर परतीच्या प्रवासात २९ नोव्हेंबरपासून एक्सप्रेस नव्या डब्यांच्या रंगरूपात धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. www.konkantoday.com