दगाफटका टाळण्यासाठी महाविकास आघाडीने आमदारांसाठी आखला ‘हा’ खास प्लॅन!!

मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. पण त्याआधीच महाविकास आघाडी सरकारने आमदारांबाबत सावध भूमिका घेतली आहे.शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबतच काँग्रेसनेही हॉटेल ग्रॅण्ड हयातमध्ये आमदारांसाठी रूम बुक केल्या आहेत. महाविकास आघाडीचे सगळे आमदार हॉटेल ग्रॅण्ड हयातमध्ये थांबणार आहेत.

शरद पवार मुंबईत तळ ठोकणार*सत्तास्थापनेसाठी शरद पवारही पुढील चार दिवस मुंबईतच राहणार आहेत. तर सुप्रिया सुळेही मुंबईत राहून आमदारांवर लक्ष ठेवणार आहेत. जिंकून येणाऱ्या बंडखोर आणि अपक्षांसोबत संपर्क साधण्याची जबाबदारी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेस हायकमांडने विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच निरीक्षकांची नेमणूक केली आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी या निरिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्यासहकर्नाटकचे नेते डॉ. जी. परमेश्वरा यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button