
कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम गुरुवार ५ सप्टेंबरपासून सुरू.
जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम यावर्षी पाच दिवस उशिराने सुरू होत असून चालू वर्षीचा हंगाम गुरुवार ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. फुलोत्सवाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.प्रतिपर्यटक दीडशे रुपये पर्यटन शुल्क व शालेय विद्यार्थ्यांसाठी चाळीस रुपये शुल्क आकारले जाणार असून विद्यार्थ्यांनी सोमवार ते शुक्रवार येणे तसेच सोबत महाविद्यालय प्राचार्याचे पत्र आवश्यक आहे. बारा वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश आहे. ऑनलाईन बुकिंगसाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावर पर्यटकांना नोंदणी करावी लागणार आहे.कास पठार कार्यकारी समितीकडून हंगाम सुरू करणे बाबतचे सर्व नियोजन करण्यात आले असून यावर्षी हंगामासाठी साधारणपणे १३० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रशस्त पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.