२६५ दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याप्रकरणी गौतम अदाणींवर आरोप!

अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्यावर कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अमेरिकेच्या वकिलांनी बुधवारी सांगितले की, अदाणी आणि त्यांचा पुतण्या सागर अदाणी यांच्यासह इतर सात जणांनी २० वर्षांत २ अब्ज डॉलर्सचा नफा मिळवून देणारा आणि भारतातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना २६५ दशलक्ष डॉलर्सची लाच दिली. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या प्रकरणी अदाणी समूहाशी संपर्क साधला, मात्र त्यावर अदाणी समूहाकडून उत्तर दिले गेले नाही. याआधी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने आरोप केले होते, अदाणी समूहाने त्यावेळी हे आरोप तात्काळ फेटाळून लावले होते.

अमेरिकेच्या सरकारी वकिलांनी असेही म्हटले की, अदाणी आणि अदाणी ग्रीन एनर्जीमधील कार्यकारी अधिकारी आणि माजी सीईओ विनीत जैन यांनी कर्जदार आणि गुंतवणूकदारांपासून हा भ्रष्टाचार लपवून ठेवला आणि ३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक कर्ज आणि रोखे गोळा केले.गौतम अदाणी यांच्यावर करण्यात आलेल्या दोषारोपानुसार, या प्रकरणात सामील असलेल्या षडयंत्रकर्त्यांनी गौतम अदाणी यांना न्युमेरो युनो आणि द बिग मॅन या सांकेतिक नावांनी खासगीरित्या संबोधले होते. तर लाच देण्याची प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सागर अदाणी यांनी आपला मोबाइल फोन वापरला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button