हनुमान मंदिरात चोरी करणाऱ्या वर्षीय तरुणास मंडणगड पोलिसांनी ताब्यात घेतले.

मंडणगड केळवत येथील हनुमान मंदिरात चोरी करणाऱ्या विनोद रामराव राठोड या ३३ वर्षीय तरुणास मंडणगड पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजता घडली. या बाबतची फिर्याद केळवत येथील अल्पेश भोसले (३४) यांनी मंडणगड पोलीस स्थानकात दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद रामराव राठोड याने १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता केळवत वरचीवाडी येथील हनुमान मंदिरात प्रवेश केला व दानपेटीचा कडी-कोयंडा स्क्रू ड्रायव्हर व पकडीच्या मदतीने तोडून पेटीतील ८,८३९ रुपयांच्या नोटा व नाणी चोरली व आपल्या बॅगेमध्ये ठेवली. बॅग घेऊन मंदिरातून तो जाण्याच्या बेतात असताना फिर्यादी भोसले यांनी त्यास रंगेहाथ पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. या बाबत नोंदवण्यात आलेल्या फिर्यादीनुसार राठोडवर मंडणगड पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button