सर्व्हे काहीही आले तरी महाविकास आघाडीचं सरकार येईल-अंबादास दानवे.
एक्झिट पोलच्या अंदाजांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं की, ‘आम्ही काही एक्झिट पोल पाहिले आहेत आणि ऐकले आहेत. मात्र, ज्या प्रकारे आम्ही जमिनीशी जोडलेलो आहोत आणि आम्ही अनेक ठिकाणी पाहत आहोत. महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. एक्झिट पोल काहीही आले तरी लोकांनी महायुतीला हटवण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीचा सुपडा साफ होईल. आता सर्व्हे काहीही आले तरी महाविकास आघाडीचं सरकार येईल’, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.