मुंबई-पुणे दृतगती मार्गावर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली; ११ जण जखमी!

मुंबई पुणे दृतगती मार्गावर बस २० फुट खड्ड्यात कोसळली. यात ११ प्रवाशी जखमी झाले. जखमींवर खोपोली नगर पालिकेच्या रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे.खोपोली जवळ गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

खाजगी बस सांगोला येथून मुंबईच्या दिशेने येत होती. यावेळी कोंंबड्यांची वाहतूक करणाऱ्याने या बसला मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे बस चालकाचे नियंत्रण गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि बस बॅरिअर तोडून २० फूट खड्ड्यात कोसळली. या दर्घटनेत ११ जण जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच पोलीस, आयआरबी, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला टीमचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमींना बसमधून बाहेर काढत, उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती आहे. खोपोली पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button