
*पाली-वळके सीमेनजीक बिबट्याची दहशत, नागरिकांच्यात घबराट*
__रत्नागिरी तालुक्यातील पाली देवतळे वळके सीमेनजिक सकाळच्या दरम्यान फीरण्यासाठी व व्यायामासाठी या परिसरात गेलेल्या नागरिकांसमोर बिबट्याने पाली वळके हा रस्ता अचानक झेप घेत ओलांडला व तो पालीकडील जंगलमय भागात गेला. काही दिवसात त्याच परिसरात चार ते पाच कुत्रे बिबट्याने मारल्याने आता बिबट्या नागरी वस्तीत सातत्याने वावरत असल्याने सर्वत्र घबराट पसरलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाली देवतळे वळके सीमेनजिक सकाळच्या दरम्यान फीरण्यासाठी व व्यायामासाठी या परिसरात गेलेल्या नागरिकांसमोर बिबट्याने पाली वळके हा रस्ता अचानक झेप घेत ओलांडला व तो पलिकडील जंगलमय भागात गेला. हा बिबट्याचा वावर होत असलेला परिसर मुख्य नागरी वस्तीचा भाग असल्याने या परिसरात राहणार्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. www.konkantoday.com