
कोकण मार्गावर बांद्रा-मडगाव साप्ताहिकाची प्रवासी संख्या रोडावली.
कोकण मार्गावर पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने आठवड्यातून दोन वेळा चालवण्यात येत असलेल्या बांद्रा-मडगांव साप्ताहिक गाडीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवासी संख्या रोडावली आहे. कोकण मार्गावरील महत्वाच्या स्थानकांवरील थांबे वगळण्यात आल्याचा मोठा फटका रेल्वे प्रशासनाला बसत आहे. खेड स्थानकातही थांबा देण्यात आलेला नाही. यामुळे प्रवासी संख्या घटली असून कोकण मार्गावर महत्वाच्या स्थानकांवर थांबे द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.www.konkantoday.com