शाम्पूचा वापर सुरू झाल्याने रिंगीची मागणी घटली
रिंगीचे झाड जरी जंगली समजले जात असले तरी त्याला येणार्या फळांचा वापर पूर्वी कोकणात साबण अर्थात शाम्पू म्हणून केला जात असे. कोकणच्या ग्रामीण भागात पूर्वी प्रत्येक घरपरड्यात एकतरी रिंगीचे झाड लावले जायचे. तरूण पिढी विविध शाम्पूचा वापर करू लागल्याने वापर आणि मागणी घटल्याने पूर्वी दहा ते बारा रुपये किलो असणारा रिंगीचा दर आता ५० पैसे ते दोन रुपये किलोएवढा झाला आहे.www.konkantoday.com