
शरद पवार यांचे महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाचे संकेत
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. यावेळी शरद पवार यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाचे संकेतदिले. मी काही ज्योतिषी नाही. पण एकूण चित्र असं दिसतंय की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असे शरद पवार यांनी सांगितले. मला असं दिसतंय की, इकडे सत्तापरिवर्तन होईल, लोकांना बदल अपेक्षित आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले. यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांनी महायुतीला बहुमत मिळण्याचा जो दावा केला होता, त्याची खिल्ली उडवली.