रेशन दुकानाचे 700 किलो धान्य ट्रक मधून चोरले.
रत्नागिरी येथील रेशनच्या धान्याचा काळा बाजार हाेत असल्याच्या तक्रारी गेली अनेक महिने सुरू हाेत्या. अखेर शासकीय धान्याची चाेरी हाेत असल्याची बाब उघड झाली असून, तब्बल ७०० किलो धान्य चोरल्याचे उघड झाले आहे.याप्रकरणी संशयित म्हणून रमाकांत मोरे (रा. शिरळ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत ट्रक चालक कैलास शंकर सावंत (रा. देवरूख) यांनी पोलिस स्थानकात याबाबत फिर्याद दिली आहे. तीन दिवसांपूर्वी रत्नागिरीहून रेशनचे धान्य भरलेला ट्रक चिपळुणात दाखल झाला होता. मात्र, चालकाची तब्येत बिघडल्याने हा ट्रक चिपळूण पेठमाप येथे एका सोसायटीच्या गोडाऊनजवळ उभा होता. याचा फायदा घेत रमाकांत मोरे याने या ट्रकमधील ५० किलोची १४ पोती लांबविली. त्याची किंमत १७,५०० रुपये इतकी आहे.