*बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मतदानासाठी आला असता आजोबांनी केली नवीन टॉयलेट बांधून देण्याची मागणी.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानेही सकाळी मतदान करत आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र तो मत देऊन परत जात असताना अक्षयला एका आजोबांनी थांबवलं आणि त्याने बांधून दिलेलं टॉयलेट आता खराब झालं असल्याचं सांगितलं. अक्षयचा ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर अक्षयने एका आजोबांना टॉयलेट बांधून देण्यास मदत केली होती. मत देऊन परतत असताना तेच आजोबा त्याला परत भेटले. घरी परत चाललेल्या अक्षयला त्यांनी अडवलं. आजोबा त्याला म्हणाले, ‘सर तुम्ही जे टॉयलेट बनवलं होतं हॉटेलच्या बाजूला ते सडलंय. नवीन द्या ना मी त्याला मेन्टेन करेन.’ त्यावर अक्षय त्याला म्हणतो, ‘हा करूया. त्याबद्दल मी बोलून घेतो. मी बीएमसीवाल्यांशी बोलून घेतो.’पुन्हा आजोबा त्याला म्हणतात, ‘ते लोखंडाचं आहे तर ते रोज सडतं. त्याच्यावर रोज पैसे लावावे लागतात.’ त्यावर अक्षय म्हणतो, ‘बोलूयात. बीएमसी त्याचं काम करून देईल.’ त्यावर काका म्हणतात, ‘डब्बा तर तुम्हाला द्यायचाय. मी लावतो.’ त्यावर अक्षय म्हणतो,’डब्बा तर मी दिलाय. बीएमसी त्यांचं काम करेल ना सर, मी नाही ना काही करू शकत. मी कसा देणार.’ त्यानंतर त्या काकांना बाय बोलून तो तिथून निघून जातो.’अक्षयला तिथे आजोबांच्या मागणीवर नेमकं काय बोलावं हेच सुचेनासं झालं होतं.