नोव्हेंबरच्या अखेरीस किनारी पट्ट्यात गारठ्यात वाढ होण्याची शक्यता
पावसाळा ओसरल्यानंतर आता कोकण किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किनारी पट्ट्यात गारठ्यात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दोन दिवसांपूर्वी अवकाळीचा झालेला शिडकावा आणि मळभाचे वातावरण आता निवळले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. आंब्यासह काजू बागायतदारांनी थंडीच्या चाहुलीने आता फवारणीची जुळवाजुळव सुरू केली आहे. www.konkantoday.com