नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा हे मतदानासाठी कोथरूडमध्ये?
Maharashtra Election नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा हे आज बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघात मतदान करणार आहेत. काय विश्वास बसत नाही?होय, हे खरे आहे. त्यामुळे कोथरूड मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहेमतदारयादीत नामसाधर्म्य असलेली अनेक नावे असतात. त्यामुळे गोंधळही उडतो. त्यावरून अनेक गैरसमजही होतात. असाच गैरसमज सध्या कोथरूड मतदारसंघात झाला आहे.
मोदी, गांधी, पवार, शहा ही सर्व मंडळी कोथरूडमध्ये मतदान कसे करणार, यावरून हा गोंधळ उडाला आहे. मात्र, यात नामसाधर्म्य हेच मूळ कारण आहे.Pune Election
या मतदारसंघात नरेंद्र धीरजलाल मोदी, राहुल अनिल गांधी, शरद रामचंद्र पवार, अमित अशोक शहा, एकनाथ सोमनाथ शिंदे, अजित आत्माराम पवार, संजय एकनाथ राऊत, आदित्य प्रभाकर ठाकरे व रोहित राजेंद्र पवार हे मतदार आहेत.
या मतदारांना मतदार चिठ्ठ्या मिळाल्या आहेत. त्यावरून हा गोंधळ उडाला आहे. मात्र, संपूर्ण नाव तपासले असता तो गोंधळ दूर होतो.
एका राजकीय पक्षाला शंका आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे तक्रार केली. दिवसे यांनी कोथरूड मतदारसंघाचेतक्रार केली. दिवसे यांनी कोथरूड मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाडे यांना सत्यता पडताळणीचे आदेश दिले. त्यानुसार गाडे यांनी संबंधित केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्याकडून याची पडताळणी केली. त्यानुसार हे सर्व मतदार असल्याचे आढळले आहे.
नामसाधर्म्य असल्याने सुरुवातीला गोंधळ उडू शकतो. मात्र, पूर्ण नाव वाचल्यास नाव वेगळे असल्याचे स्पष्ट होते. या मतदारांची पडताळणी केली आहे. ते योग्य असल्याचे आढळले आहे.