धारावी प्रकरणी शरद पवार यांनी शिवसेना व काँग्रेसला एकाकी पाडले.
विधानसभा निवडणुकीत धारावी झोपडपट्टीचं पुनर्वसन हा राजकीय मुद्दा करण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षानं केला आहे. राहुल गांधी यांनी सोमवारी (18 नोव्हेंबर) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत या विषयावर मोदी सरकारवर लक्ष केलं होतं.राहुल गांधींच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ उत्तर दिलं होतं. आता त्यापाठोपाठ महाविकास आघाडीतील सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी धारावी प्रकरणाचं सत्य सांगितलं आहेशरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये धारावी पुनर्विकासाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘धारावीचा काही प्रश्नच नाही. ते सर्व जण अदाणींवर टीका करत आहेत. ही बैठक झाली तेव्हा अदाणी यांना धारावीमध्ये कोणताही रस नव्हता. खरतंर धारावीचा प्रोजेक्ट दुसऱ्या लोकांना देण्यात आला होता. ते इथं आले होते. या विषयावर काही चर्चा आणि वाटाघाटी सुरु होत्या, पण त्या अदाणींसोबत नाही, असं पवारांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलंय