डॉ. बाळासाहेब सावंत कृषि विद्यापिठाचे विद्यार्थी घेणार आता परदेशातील विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि वेस्टर्न सिडनी युनिर्व्हसिटी, ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान वेस्टर्न सिडनी युनिर्व्हसिटी ऑस्ट्रेलियाचे कुलगुरू प्राध्यापक जॉर्ज विलियम्स आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. सतिश नारखेडे यांनी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथे कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. आर. सी. अगरवाल यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत.
या करारानुसार कृषि विद्यापीठामध्ये तीन वर्षाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चौथे एक वर्ष वेस्टर्न सिडनी युनिर्व्हसिटी, ऑस्ट्रेलिया येथे पूर्ण करता येणार आहे. तसेच अधिकचे एक वर्ष सिडनी युनिर्व्हसिटीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केल्यास दोन वर्षामध्ये त्यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाची पदवी व वेस्टर्न सिडनी युनिर्व्हसिटीद्वारा पदव्युत्तर पदवी अशा दोन पदव्या केवळ पाच वर्षाच्या कालावधीत मिळणार आहेत. www.konkantoday.com