ठाकरेंच्या आवाहनाला शिंदेंसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी कात्रजचा घाट दाखवला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून कानपिचक्या देऊनही काँग्रेस नेत्या खासदार प्रणिती शिंदे ह्या शिवसेनेचे सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारात शेवटपर्यंत सहभागी झाल्याच नाहीत.उलट ठाकरेंच्या आवाहनाला शिंदेंसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी कात्रजचा घाट दाखवत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत दिसलेली एकी विधानसभेत मात्र बेकीत रुपांतरित झाली, त्याचा फटका महाआघाडीला बसण्याची शक्यता आहे.