खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्यावर कचराचे साम्राज्य
खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयाच्या लगत असणारा रस्ता चक्क कचरा डेपोच बनला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्लास्टिक पिशव्यांचा अक्षरशः खच पडला आहे. या कचर्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली असून अतिशय गलिच्छ चित्र निदर्शनास पडत आहे. नागरिक व कामगार वर्गाला त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.खेर्डी औद्योगिक वसाहत ही जिल्ह्यातील सर्वात जुनी आहे. या परिसरात खेर्डींसह आजुबाजूच्या गावातील नागरिक सकाळ, संध्याकाळ वॉकिंगसाठी येतात. तेथे कंपन्या, कारखाने असल्याने कामगार वर्गाची रेलचेल असते. त्यामुळे येथील रस्त्यांवर कायम वर्दळ असते. या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यालय आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या कार्यालयालगत असणार्या रस्त्याला सध्या कचर्याने विळखा घातला आहे.www.konkantoday.com