एक्झिट पोल नुसार महाविकास आघाडी आणि महायुतीत काट्याची टक्कर

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आज एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. मतदान संपल्यानंतर सायंकाळी एक्झिट पोलचे अंदाज जारी करण्यात आले आहेत.महाराष्ट्राच्या इतिहासातील आजपर्यंतची ही निवडणूक तशी ऐतिहासिकचं राहिली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत काट्याची टक्कर पहायला मिळत आहे. दरम्यान काही एक्झिट पोलच्या अंदाजात महाविकास आघाडीला बहुमत मिळताना दिसत आहे तर महायुती १२१ जागांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही पोलमधून महायुतीला १८६ जागा मिळतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

चाणक्य स्ट्रॅटेजीच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १५२ ते १६० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागा मिळतील. सहा ते आठ जागा इतर लहान पक्ष आणि अपक्षांना मिळतील असा अंदाज वर्तवला गेला आहे.ELECTORAL EDGE ZE च्या अंदाजानुसार, भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. भाजपने सर्वाधिक १४८ जागांवर उमेदवार उभे केले असून ७८ जागा मिळू शकतात. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या २७ जागा कमी होत असल्याचं दिसत आहे.मेघ अपडेट्सच्या अंदाजानुसार भाजपा महायुतीला १५० ते १७० जागा निवडणूक निकालात मिळतील तर काँग्रेससह महाविकास आघाडीला केवळ ११० ते १३० जागांवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तसंच अपक्ष आणि इतरांना ८ ते १० जागा मिळतील.

असा अंदाज आहे.PMARQ च्या एक्झिट पोलमध्येही महाराष्ट्रात भाजप आघाडी म्हणजेच महायुतीला आघाडी मिळताना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार, महायुतीला 137-157, महाविकास आघाडीला 126-146 आणि इतरांना 2-8 जागा मिळण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल असा अंदाज मॅट्रीज एक्झिट पोलने वर्तवला आहे. या एक्झिट पोलमध्ये भाजप आघाडीला 150-170 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 110-130 जागा मिळतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रात 288 जागा आहेत. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button