अमित ठाकरेनी सदा सरवणकराशी असं काय केलं की सगळ्यांचं लक्ष वेधलं.
आज मतदानाच्या निमित्ताने मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात अमित ठाकरे आणि सदा सरवणकर दर्शनाकरता गेले होते. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मंदिरात बाप्पाकडे काय मागितलं असं विचारलं असता अमित ठाकरे म्हणाले, “मी बाप्पाकडे काही मागत नसतो. अशा महत्त्वाच्या प्रसंगी मी मंदिरात येतो. बाप्पाने मला आधीच खूप काही दिलंय. फक्त मी आशीर्वाद घेण्याकरता येथे आलो आहे. “माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या समोरच सदा सरवणकरही माध्यमांशी बोलत होते. तेवढ्यात माध्यम प्रतिनिधींनी या दोघांचीही भेट घालून दिली. दोघांनीही एकमेकांकडे पाहून हस्तांदोलन केलं अन् एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. सदा सरवणकर म्हणाले, “मी सर्वच उमेदवारांना मन:पुर्वक शुभेच्छा देतो. हा लोकशाहीचा महोत्सव आहे. यात सर्वंच उमेदवार जिंकता आले असते तरी चांगलं झालं असतं.
एकनाथ शिंदेंसारखा दयावान आणि गोरगोरीबांची दया असणारा व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत”, असं सदा सरवणकर म्हणाले. तर, ” मी माझे १०० टक्के दिले आहेत. त्यांनीही त्यांचे १०० टक्के दिले असतील. त्यामुळे त्यांनाही खूप खूप शुभेच्छा.”अमित ठाकरेंच्या कृतीने वेधलं लक्षदरम्यान, शुभेच्छा दिल्यानंतर अमित ठाकरेंचं लक्ष सदा सरवणकर यांच्या खिशाला लावलेल्या धनुष्यबाणावर गेलं. त्यांच्या खिशावरील धनुष्यबाण खालच्या बाजूने झुकलं होतं. त्यामुळे लागलीच अमित ठाकरे यांनी ते सरळ केलं आणि ते पुढे निघाले. आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या चिन्हाचा मान त्यांनी राखल्याने त्यांच्या कृतीकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.