शिवसैनिकांनी अपयशाने खचून जावू नये, डॉ. प्रतिक झिमण.

. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यभर शिवसेनेसह सर्वच विरोधी पक्षांना अपयश आले आहे. या अपयशाने आपण बिलकुल खचून जाता कामा नये, आपण बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक आहोत. आपल्याला आलेल्या अपयशाचे आपण आत्मचिंतन करू, नव्या जोमाने जनतेची सेवा करू, कोणीही निराश होवू नका, आपले पक्षप्रमुख, सन्माननीय नेते मंडळी आपल्याला लवकरच मार्गदर्शन करतील. यापुढे आपण सर्वांनी एकजूट कायम ठेवूया. विरोधकांवर टीका करीत बसण्यापेक्षा जनतेत जावून त्यांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. संघटनेतील त्रुटी सुधारून अधिक जोमाने काम करूया, असे आवाहन डॉ. प्रतिक झिमण यांनी केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button