वीजतज्ज्ञ अशी संपू्र्ण महाराष्ट्राला ओळख असणारे प्रताप होगाडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

. वीजतज्ज्ञ अशी संपू्र्ण महाराष्ट्राला ओळख असणारे आणि पुरोगामी चळवळीचे खंदे कार्यकर्ते व अभियंते प्रताप गणपतराव होगाडे (वय ७४) यांचे काल सकाळी घरात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.ते समाजवादी पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्षही होते. त्यांच्या निधनामुळे वीज क्षेत्रातील चळवळीची मोठी हानी झाली आहे. येथील दाते मळ्यातील त्यांच्या निवासस्थानापासून आज (ता. १९) सकाळी आठ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांना गेल्या तीन-चार दिवसांपासून ताप होता, तर रविवारपासून अशक्तपणा जाणवत होता. त्यांना आज सकाळी अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रासह वीज क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button