विरोधी उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा राजन साळवी यांचा आरोप.
निवडणुकीत पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून आता कोकणातील राजकारण तापले आहे. विरोधी उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर – लांजा-साखरपा या विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी केला.यानंतर मध्यरात्री थेट राजन साळवी यांनी लांजा पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे अधिक माहिती अशी की, रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील एका ग्रामीण भागात गणेश लाखन नावाचे शिवसेनेचे शिंदे गटाचे पदाधिकारी एका घरामध्ये संशयास्पदरीत्या पैसे देत असल्याची बाब गावच्या पोलीस पाटलांच्या निदर्शनामध्ये आली. यानंतर सरपंच आणि पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला याबाबतची तक्रार केली. शिवाय महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी हे देखील त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर साळवी यांनी थेट लांजा पोलीस स्टेशन गाठले.सदर संपूर्ण प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.