
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजिक कार-रिक्षाच्या
अपघातात चालकाचा मृत्यू. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निढळेवाडी येथे शनिवारी सायंकाळी एका भरधाव कारने रिक्षाला पाठिमागून धडक दिली. या अपघातात रत्नागिरी येथे वास्तव्यास असलेले अस्लम सुलेमान बोट (वय ५४, मी मूळ रा. संगेमश्वर-कळंबस्ते, सध्या रा. रत्नागिरी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात बोट यांची पत्नी शबाना बोट यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात संध्याकाळी झाला.संगमेश्वर कळंबस्ते दर्र्याचा उरूस असल्याने रत्नागिरी येथून अस्लम बोट व त्यांची पत्नी शबाना बोट ही हे दाम्पत्य रिक्षाने कळंबस्ते येथे शनिवारी आले होते. संध्याकाळी रिक्षा येवून रत्नागिरीकडे जात असताना मागून भरधाव वेगाने येणार्या कारने जोरदार धडक दिल्याने बोट यांची रिक्षा रस्ता सोडून दरीत जावून कलंडली. यात अस्लम बोट यांचा मृत्यू झाला. या
अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या रिक्षातील अस्लम बोट व त्यांच्या पत्नी यांना रूग्णवाहिकेने ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. यातील अस्लम बोट यांचे उपचारापूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात अनेकांची गर्दी झाली. बेदरकार वाहन चालवून अपघातास जबाबदार असलेला चाक घटनास्थळावरून पसार झाला. www.konkantoday.com