जिल्ह्यामध्ये बोगस मतदान रोखण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेची करडी नजर
रत्नागिरी, दि. १८ – जिल्ह्यामधील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सोय करण्यात आली असून, त्याचा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात असणार आहे. या ठिकाणांहून सर्व केंद्रांवर चालणाऱ्या मतदानाचे निरीक्षण केले जाणार आहे. कोणतेही बोगस मतदान होणार नाही, याबाबत सर्व मतदान केंद्राध्यक्ष आंणि सर्व केंद्राध्यक्ष अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिस विभागाला देखील त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान कंद्रांवर कोणत्याची स्वरुपाचे बोगस मतदान अथवा तोतयेगिरी आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिस विभागाला आदेशित करण्यात आले आहे.तसेच जिल्ह्यामध्ये पाचही विधानसभा मतदार संघामध्ये निर्भय, शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक होण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे.
दिनांक 17-11-2024 रोजी निवडणूक निरिक्षक (खर्च) यांनी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विषयक कामाचा दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीमध्ये देखील निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्यात शांततापूर्ण, निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले आहेत. निवडणूक निरीक्षकांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करप्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली असून, बोगस मतदान रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत,