कल्याण मध्ये प्रचार रॅलीत फोडलेल्या फटाक्याने उमेदवाराचे केस पेटले
आता कल्याणमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. कल्याण पश्चिमेत प्रचार रॅलीदरम्यान फटाके फोडणे एका उमेदवारांच्या जीवाशी बेतणार होते यामुळे एका उमेदवाराच्या डोक्यावरचे केस जळाले.विधानसभा निवडणुकांचा प्रचाराचा काल शेवटचा दिवस आहे. मात्र कल्याण पश्चिम मतदारसंघात काल जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा हे प्रचार करत होते. यावेळी काही हौशी कार्यकर्त्यांनी केलेल्या एका घटनेमुळे त्यांच्या जीवावर बेतले होते पण ते थोडक्यात बचावलेजिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा हे प्रचार करत असताना भोईरवाडी परिसरात त्यांच्या स्वागतासाठी भव्य दीडशे किलो वजनाचा हार तयार करण्यात आला होता. हा हार क्रेनच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यात टाकण्यात आला. या हारासोबत काही इलेक्ट्रिक स्पार्कर्स फटाके लावण्यात आले होते. अचानक या फटाक्यांची ठिणगी उडाली आणि ती मुथा यांच्या डोक्यावर उडाली.यानंतर क्षणार्धात राकेश मुथा यांच्या केसांनी पेट घेतला. यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून ही आग विझवली. यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. तसेच कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा अतिरेकी उत्साह हा कशाप्रकारे धोका निर्माण करू शकतो, याचा जिवंत पुरावा यामुळे मिळाला.