
वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता वाहतूक पोलीस कंट्रोल रूममधून नजर
वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता वाहतूक पोलीस कंट्रोल रूममधून नजर ठेवणार आहेत. यासाठी अत्याधुनिक असे ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे पोलीस प्रशासनाने मारुती मंदिर येथे बसवले आहेत.या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढेयांच्या हस्ते आज मारुती मंदिर येथील जिल्हा वाहतूक कार्यालयात करण्यातयेणार आहे
या पी टी झेड (PTZ) झूम कॅमेरा 360 कोनातून सगळीकडे फिरणार आहे. आणि ऑफिसमध्ये बसून सगळी देखरेख एक व्यक्ती करू शकते अशी ही यंत्रणा आहे.
मारुती मंदिर येथे हा कॅमेरा लावण्यात आलेला असून त्यातील एक कॅमेरा हा मारुती मंदिर ते माळनाका परिसरात नियंत्रण ठेवणार असून 360कोनातून चित्रीकरण या कॅमेरा ने होणार आहे. तर दुसरा कॅमेरा मारुती मंदिर ते वाहतूक शाखेचे कार्यालय पर्यंतचे सगळे चित्रीकरण करणार करणार आहे.
हा कॅमेरा मानवविरहित असल्याने वाहतूक शाखेच्या कार्यालयात एक कर्मचारी बसून याची यंत्रणा हाताळू शकणार आहे हे दोन कॅमेरे प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले असून पुढे शहरातील विविध चौकात असे कॅमेरे बसवले जाण्याची शक्यता आहे. ही पद्धत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या यांच्यासाठी ही चलनासाठी असून आपोआप अपघात यावर आळा बसणार आहे. तसेच धूम स्टाईलने गाड्या फिरवणाऱ्या तरुणांच्या मोबाईलवर दंड आकारला जाणार आहे.
यामध्ये कार्यालयीन कर्मचारी झूम करून नियम मोडणार यांचे फोटो काढले जाणार आहेत. गाडीचा नंबर, व्यक्तीच्या चेहऱ्याचा फोटो सॉफ्टवेअर मध्ये टाकल्यावर त्या गाडीची सविस्तर माहिती मिळाल्यावर त्या व्यक्तीला मोबाईल वरूनच ऑनलाइन पद्धतीने दंडाची रक्कम दिली जाणार आहे. चारचाकी गाड्यांसाठी असून गाडी चालवताना सीट बेल्ट न लावणे नो पार्किंगमध्ये गाडी उभी करणे यांच्या त्यासाठीही वापरली जाऊ शकते.
www.konkantoday.com
