
परराज्यांतील नौकांचा धुमाकूळ, हर्णैतील नौकेतील खलाशांना मारहाण.
राज्याच्या जलदी क्षेत्रामध्ये घुसखोरी करून मासेमारी करणार्या केरळ, कर्नाटक या परराज्यातील नौकांनी धुमाकळ घातला आहे. १३ तारखेला पुन्हा एकदा हर्णे बंदरातील नौकेवर समुद्रात फास्टर नौकेच्या खलाशांनी हल्ला चढवला. यामध्ये नौकेवरील तांडेल जखमी झाला तर नौकेची किमान लाखाचे नुकसान झाले आहे. मत्स्य विभागाच्या गस्ती नौकेने याला आळा घालण्याची मागणी मच्छिमारांनी केली आहे.हल्ल्यात नुकसान झालेल्या नौकेचा पंचनामा मत्स्य परवाना अधिकारी दीप्ती साळवी यांनी केला आहे. हर्णै बंदरामध्ये साधारण २२ नॉटीकल मैलाच्या आत केरळ, कर्नाटकच्या फास्टर नौका गेली ७ ते ८ वर्षे घुसखोरी करून बेकायदेशीरपणे मासेमारी करत आहेत. १३ नोव्हेंबरला दुपारी ४ च्या सुमारास हर्णै बंदरामध्ये ६ ते ७ नॉटिकल मैलाच्या अंतरावर सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या समोर फास्टर नौका मासेमारी करत होत्या. त्या ठिकाणी पाजपंढरी येथील मोरेश्वर कानू चोगले यांची सहा सिलिंडरची मंगलमूर्ती (आयएनडी एमएच ४ ए:एम २६३९) मासेमारी नौका जाळे टाकून उभी होती. एका फास्टर नौकेने जाळे ओढत असताना मोरेश्वर यांच्या नौकेचा नांगरच ओढत नेला. त्यावेळी बोटीचा नांगर त्यांच्या जाळ्यात अडकला होता.www.konkantoday.com