
चिपळूण येथील उड्डाणपुलाचे पिअर कॅप तोडण्याचे काम पूर्ण, उड्डाणपूल कामाला गती.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण शहरातून जाणार्या उड्डाणपुलावरील पिअर कॅप तोडण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता पुढील कामाला गती आली आहे. तसेच पूल मजबुतीकरणासाठी जुन्या दोन पिलरच्यामध्ये नवीन पिलर उभारण्यात येणार आहे. या कामाला गती आणण्यासाठी यंत्रणा अधिक वाढवली जाणार आहे.चिपळुणातील उड्डाणपुलाच्या कामात तीन वर्षापासून सातत्याने अडचणी येत आहेत.
या पुलासाठी सुरूवातीच्या आठवड्यानुसार एकूण ४६ पिलर उभारण्यात आले होते. त्यानंतर पुढील कामाला वेग घेत असताना १६ ऑक्टोबर २०२३ ला या पुलाचा बहाद्दूरशेख नाका येथे काही भाग कोसळला. पूल कोसळल्यानंतर उभारणीतल काही त्रुटी समोर आल्या. त्यावर केंद्र शासनाने तज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी केली. त्या समितीच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. त्यामध्येच पूर्वीचे पिलरमधील ४० मीटरचे गाळे रद्द करून त्यामधील अंतर कमी करण्यासाठी २० मीटरवर नव्याने पिलर उभारले जात आहेत. या नव्या रचनेनुसार २८२ पायलिंग उभारले जाणार आहेत.www.konkantoday.com