आंबोली घाटात रेलिंगला धडक बसून दुचाकी वरील मागे बसलेला तरुण चक्क २०० फूट खोल दरीत कोसळला
सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने येत असताना दुचाकीची रस्त्यालगतच्या रेलिंगला धडक बसून दुचाकी वरील मागे बसलेला तरुण चक्क २०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना आंबोली घाटात आज घडली.सुदैवाने त्या ठिकाणी झाडेझुडपे असल्यामुळे तो बचावला त्याच्या डोक्याला हाताला व पायांना थोडेफार दुखापत झाले ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली याबाबतची खबर त्याच्यासोबत मोटरसायकल चालवत असलेला सय्यद मकानदार (वय २४ ) याने आंबोली पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या सहकार्याने त्याला दरीतून वर काढत जीवदान दिले.