अपक्ष उमेदवार ज्योतिप्रभा पाटील यांना संभाजी ब्रिगेडचा बिनशर्त पाठिंबा.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा ज्योतीप्रभा पाटील यांना मिळालेला आहे.पाटील यांना दिलेल्या समर्थन पत्रात खालील विषय नमूद करण्यात आले आहेत.”संभाजी ब्रिगेड पक्षाने शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित समताधारित समाजाची उभारणी करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आपले ध्येय याच पार्श्वभूमीवर, अपक्ष उमेदवार ज्योतिप्रभा पाटील यांच्या पुरोगामी विचारधारेचा आणि विकासाभिमुख भूमिकेचा आदर करत, त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी बिनशर्त जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.ज्योतिप्रभा पाटील यांच्या नेतृत्वात खालील मुद्द्यांवर कार्य करण्याचा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे:1. मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश आणि आरक्षणाचे संरक्षण.2. जातनिहाय जनगणना करून सामाजिक न्याय प्रस्थापित करणे.3. बेरोजगारीच्या समस्येवर ठोस उपाययोजना राबवणे.4. महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी उपक्रम राबवणे.5. शिक्षण, आरोग्य आणि शेतकरी धोरणांत सुधारणा करून समाजातील सर्व थरांना न्याय मिळवून देणे.6. शिक्षक, विद्यार्थी, आणि कष्टकरी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी विधानसभेत प्रखर आवाज उठवणे.7. जुन्या पेन्शन योजनेचे पुनरुज्जीवन.संभाजी ब्रिगेड पक्षाचा हा पाठिंबा महाराष्ट्रातील समाजहित आणि रत्नागिरीच्या विकासाच्या दृष्टीने निर्णायक ठरेल, असा आमचा विश्वास आहे.