मुंबई गोवा महामार्गावर राजापूर मुंबईला जाणारी बस पलटली.
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडीच्या पुढे गांधे फाट्या (आमटेम) गावानजिक तारळ धुमाळवाडी राजापूर येथून मुंबईकडे जाणार्या बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या खाली पलटी होऊन अपघात झाल्याची घटना 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली असून यात 26 जण जखमी झाले आहेत.सुदैवाने यात जीवित हानी झालेली नाही.याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोकणातील तारळ धुमाळवाडी राजापूर येथून मुंबईकडे जाणार्या बसवरील चालक विनोद हळदणकर हा त्याच्या ताब्यात असणारी बस घेवुन मुंबईकडे जात असताना सदर बस रायगड जिल्ह्यातील मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील कोलेटीवाडीचे पुढे आमटेम गावानजीक आली असता चालक विनोद हळदणकर यास झोपेची डुलकी लागल्याने बस रस्त्याच्या खाली जावून पलटी होऊन अपघात झाला आहे.