डेन्मार्कच्या व्हिक्टोरियाने जिंकला ७३ व्या मिस युनिव्हर्सचा किताब
डेन्मार्कची व्हिक्टोरिया केजर थेलविग हिने ७३ व्या मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आहे. डेन्मार्कच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.मेक्सिको सिटीतील एरिना सीडीएमएक्स येथे सौंदर्य स्पर्धा पार पडली. दरम्यान, भारताची रिया सिंघा टॉप १२ स्पर्धकांत स्थान मिळवू शकली नाही.व्हिक्टोरिया केजर थेलविगने प्रतिष्ठित मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला. नायजेरियाची चिदिम्मा अदेत्शिना फर्स्ट रनर-अप आणि मेक्सिकोची मारिया फर्नांडा बेल्ट्रान सेकंड रनर-अप ठरली. या सौंदर्य स्पर्धेतील टॉप ५ फायनलिस्टमध्ये थायलंडची ओपल सुचता चुआंगश्री आणि व्हेनेझुएलाची इलियाना मार्केझ यांचा समावेश होता.