आम्हाला केवळ शिवसेना आणि भाजपा यांची युती वेगळी करायची होती -शरद पवार.
२०१४ ला भाजपला (BJP) पाठिंबा दिल्याच्या चर्चेवर शरद पवार यांनी भाष्य केले आहे. भाजपाला पाठिंबा देण्याचा काही प्रश्नच नव्हता. आम्हाला शिवसेनेला भाजपापासून वेगळं करायचं होतं म्हणून राजकीय चाचपणी केली असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, ‘ विनाकारण नाही, तर २०१४ साली भाजपाला आम्हाला पाठिंबा द्यायचा नव्हताच. आम्हाला केवळ शिवसेना आणि भाजपा यांची जी युती होती त्यांना वेगळे कसं करता येईल. करू शकतो का हे आम्हाला पाहायचे होते.त्यासाठी चाचपणी म्हणून आम्ही राजकीय विधान केले आम्ही त्यांना मदत कधी केली नाही. केवळ विधान केले होते मात्र त्या विधानानंतर जसं आम्हाला हवं होते तेच झाले. भाजपा गेले आणि शिवसेना आमच्यासोबत आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले’, असे शरद पवार यांनी म्हंटले