
पुण्यात आमदार उदय सामंत यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे रत्नागिरीत सामंत समर्थक संतप्त ,शिवसेना कार्यालयासमोरच व शहरात निषेधाचे फलक
माजी मंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर काल ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दौर्यावर असताना पुणे येथे त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला सुदैवाने यामध्ये त्यांना कोणतीही इजा झाली नाही याबाबत त्यानी कोथरुड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याचे वृत्त रत्नागिरीत पसरतात सामंत यांच्या समर्थकांच्या संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकाराचा निषेध करण्यासाठी त्यांनी रत्नागिरीतील शिवसेना कार्यालयासमोरच निषेधाचा मोठा बॅनर लावला आहे
साळवी स्टॉप येथील शिवसेना शाखेच्या समोरील रस्त्यावर निषेधाचा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनर वर ‘आमदार उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध! विचारांची लढाई ही विचारांनीच लढायची असते. असे हल्ले करणारे भ्याडच ! ‘ अशा प्रकारचा मजकूर असलेला निषेध व्यक्त करणारा मोठा बॅनर शिवसेनेच्या शाखेसमोरच लावण्यात आला आहे. शहराच्या विविध भागांत उदय सामंत यांना पाठींबा दर्शवण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी रातोरात मोठे बॅनर लावले आहेत यामुळे आता रत्नागिरीतही तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या काही नेत्यांकडून उदय सामंत यांच्यावर वेळोवेळी टीका केली असतानादेखील सामंत यांनी कुणावरही टीका न करता संयमाची भूमिका घेतली हाेती मात्र कालच्या प्रकारामुळे सामंत समर्थकांच्यात असंतोष निर्माण झाला असून आज सकाळी जयस्तंभ येथील कार्यालयासमोर सामंत समर्थक निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे
www.konkantoday.com