दापोलीत आता निवडणूक विभागाकडून हेलिकॉप्टर मधून आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामानाची तपासणी

. दापोलीतील सभेसाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चे हेलिकॉप्टर दापोलीत उतरल्यानंतर त्यांच्या सामानाची तपासणी निवडणूक विभागाकडून करण्यात आलीकाही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने हेलिकॉप्टरने आले असता त्यांच्या सामानाची तपासणी करण्यात आली त्यावरून ठाकरे यांनी विरोधकांना टार्गेट केल्याचा आरोप करीत नाराजी व्यक्त केली होती व त्याचा व्हिडिओ प्रदर्शित केला होता विरोधकांकडून निवडणूक विभागावर टीका करण्यात आली होती मात्र निवडणूक विभागाने आपण नियमाप्रमाणे काम करीत असल्याचे सांगितले होते नंतर निवडणूक विभागाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री अजित पवार आदित्य ठाकरे उद्योग मंत्री उदय सामंत व विविध नेत्यांच्या सामानाची तपासणी सुरूच ठेवली होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button