इस्रो आपला नवीन कम्युनिकेश उपग्रह जीसॅट (GSAT-20- New communication satellite) प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आपला नवीन कम्युनिकेश उपग्रह जीसॅट (GSAT-20- New communication satellite) प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज आहे. यासाठी इस्रो अमेरिकन उद्योगपती एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या (SpaceX) मदतीने ही मोहिम राबणार आहे.स्पेस एक्सच्या Falcon 9 रॉकेटचा वापर करून इस्रो आपला नवीन संचार उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याचेदेखील वृत्तात म्हटले आहे.या संचार उपग्रहाला GSAT-N2 असे नाव देण्यात आले आहे आणि त्याला GSAT-20 असेही म्हटले जाते, जे भारतात विमानात इंटरनेट सेवा प्रदान करेल.
सध्या, भारतामध्ये इन-फ्लाइट इंटरनेट ॲक्सेस सुविधा प्रतिबंधित आहे. एअरलाइन्सने भारतीय हवाई क्षेत्रावरून उड्डाण करत असताना इटरनेट सेवा बंद करणे आवश्यक आहे. परंतु, सरकारने अलीकडेच भारतातील विमानांतर्गत इंटरनेट सेवांना परवानगी देण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नवीन नियमांनुसार, विमान 3,000 मीटर उंचीवर पोहोचल्यानंतर एअरलाइन्स वाय-फाय-आधारित इंटरनेट सेवा देऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.