आता प्रत्येक विद्यार्थ्याला काढावेच लागला ‘अपार कार्ड’!

काय होईल पण याचा विद्यार्थ्यांना नेमका फायदा? जाणून घ्या माहिती.

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन प्रक्रियेचा अवलंब केला जात असून जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर हा प्रत्येक क्षेत्रात कसा करता येईल व अवघड कामे सोपी कशी होतील या दृष्टिकोनातून महत्वाची पावले उचलण्यात येत आहेत.अगदी याच प्रमाणे आता केंद्र आणि राज्य सरकारने शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील खूप आमुलाग्र बदल करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलायला सुरुवात केली आहे व त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजेच अपार हा उपक्रम आहे.अपार हा एक स्वतंत्र ओळखक्रमांक असणार असून देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांना तो दिला जाणार आहे व त्यासोबत विद्यार्थ्यांना डिजिलॉकरची सोय देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. या अंतर्गत ‘एक देश एक विद्यार्थी ओळख’ ही संकल्पना प्रामुख्याने अंमलात आणली जाणार आहे.

अपार याचा जर आपण फुल फॉर्म म्हणजेच पूर्ण रूप बघितले तर ते म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री अशा पद्धतीचे आहे. हा अपार देशातील पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा बारा अंकी क्रमांक असणारा असून तो प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक ओळख क्रमांक असणार आहे.आपल्याला माहित आहे की सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी ही यु-डायस म्हणजेच युनिफाईड डिस्ट्रिक्ट अँड इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस या पोर्टलमध्ये करण्यात आलेली आहे व त्याचा व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांक म्हणजेच पीईएन क्रमांक यामध्ये नोंदवलेला आहे. आता याच पीईएन क्रमांकाची जागा अपार आयडी घेणार आहे.

विद्यार्थ्यानंसाठी फायदा असा की शिक्षणासाठीची मूळ कागदपत्रे या ठिकाणी सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर शाळा बदलायची आहे तर त्याला नव्या शाळेत सगळी कागदपत्रे जमा करण्याची गरज भासणार नाही. कारण अपारच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचे डिजिलॉकर उपलब्ध असणार आहे. तसेच, एखाद्या कंपनीमध्ये नोकरीसाठी जर उमेदवार गेले तर त्याच्या शैक्षणिक पात्रतेची खातरजमा कंपनीला करण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत व ते डीजिलॉकरच्या माध्यमातून त्यांना संबंधित उमेदवाराची शैक्षणिक पात्रता समजण्यास मदत होणार आहे.

अपार ओळख क्रमांकासाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. अपार करिता विद्यार्थ्यांचा यु-डायस नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, लिंग तसेच मोबाईल क्रमांक, आई वडिलांचे नाव, आधार कार्ड वरील नाव तसेच आधार क्रमांक इत्यादी तपशील अत्यावश्यक असणार आहे.यामध्ये मात्र विद्यार्थ्याचे यु-डायस आणि आधार कार्डवरील नाव सारखे असणे गरजेचे आहे. यामध्ये विद्यार्थी जर 18 वर्षाखालील असेल तर मात्र या प्रक्रियेकरिता पालकांची लेखी संमती घेणे अत्यावश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button