
इंदिरा कॉंग्रेस शेतकरी-कष्टकरी संघटनेतर्फे वाढती महागाई, शेतकर्यांना कर्जमाफी यासाठी देवरूख तहसिलदार कार्यालयावर मोर्चा.
वाढती महागाई, दहा लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी या मागणीसाठी इंदिरा कॉंग्रेस शेतकरी-कष्टकरी संघटना यांच्यामार्फत दि. १६ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता देवरूख तहसिलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. थकीत कर्जवसुलीसाठी बँका, सहकारी सोसायट्या, पतसंस्था दादागिरी करीत आहेत.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा सर्वपक्षीयांना विसर झाला आहे. कर्जमाफीच्या प्रमुख मागण्या दहा लाख रुपयांपर्यंत शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीयांची कर्जमाफी होणे गरजेचे आहे.शेती, दुकाने, चहाच्या टपर्या, दागिने, शैक्षणिक कर्ज, दुग्ध व्यवसाय, शेती अवजारे, बागायतदारांचे कर्ज, सावकारी कर्ज यासह अन्य कर्जासाठी दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत घेतलेल्या संपूर्ण कर्जाची माफी करणे गरजेचे आहे. कर्जदारांना वसुलीची नोटीस, कर्जमंजुरीचा पेपर, पासबुक आदी कागदपत्रे घेवून मोर्च्यात सहभागी व्हावे. दि. २८ जानेवारीला चिपळूण तहसिलदार कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन्ही मोर्चांमध्ये कर्जदार, शेतकरी, कष्टकरी नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इंदिरा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री. अशोकराव जाधव यांनी केले आहे.www.konkantoday.com