
तेलंगणात २९ मेपर्यंत लॉकडाऊन
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील लॉकडाऊनची मुदत वाढवण्याची घोषणा केली आहे . आता तेलंगणात २९मेपर्यंत लॉकडाऊन सुरु राहणार आहे. देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन १७ मेपर्यंत लागू आहे. मात्र, तो संपण्याआधीच लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली. असं करणारं तेलंगणा देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.
www.konkantoday.com