मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील एक्सरे मशिन सुविधा बंद.
मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी उपजिल्हा रूग्णालय नानाविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. एकीकडे रुग्णालयातील रिक्त पदांमुळे रूग्णांची परवड होत असताना दुसरीकडे रूग्णालयात असणारी दोन एक्सरे मशिन एक महिन्यापासून बंद असल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. तातडीच्या निदानासाठी एक्सरे काढण्याकरिता रूग्णांना ६०० रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यात वेळ अन पैसाही खर्च होत असल्याने रूग्ण मेटाकुटीस आले आहेत.कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकार्यांसह अन्य कर्मचार्यांची पदे अद्यापही रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कळंबणी उपजिल्हा रूग्णालयच आजारी पडल्याने पंचक्रोशीतून उपचारासाठी येणार्या रूग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.www.konkantoday.com