चिपळूण नगर परिषदेने उभारलेल्या तीन वाहनतळांवरील करोडो रुपयांचा खर्च वाया.
चिपळूण नगर परिषदेने शहरातील गुहागरनाका, मध्यवर्ती बसस्थानक कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुल परिसरात सुरू केलेल्या वाहनतळामध्ये फुकट्यांच्या वाहनांचे पार्किंग वाढले आहे. तसेच येथील साहित्याचीही मोडतोड केली जात असल्याचे दिसून येत आहे. तरीही प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या वाहनतळापासून एकही रुपया उत्पन्न मिळत नसल्याने त्यासाठी केलेला करोडो रुपयांचा खर्च वाया गेला आहे.
शहरातील वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता त्यावर उपाय म्हणून नगर परिषदेने काही वर्षापूर्वी करोडो रुपयांचा चुराडा करत शहरापासून काही अंतरावर असलेल्या गुहागर नाका परिसरात मोठे वाहनतळ बांधले आहे. मात्र ते बाजारपेठेतून लांब असल्याने तेथे कोणीही वाहने पार्किंग करीत नाही. त्यामुळे त्याचा वापर परिसरातील महिला तांदुळ, गहू, सुकी मच्छी वाळवत घालण्यासाठी करीत असून सायंकाळी येथे क्रिकेट, फूटबॉलचा खेळ रंगताना दिसतो. यामुळे येथे असलेल्या सुरक्षा कक्षाचा काचाही फुटल्या असून कोणीतरी मुख्य प्रवेशद्वारही तोडले आहे. त्यामुळे येथे केलेला खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. www.konkantoday.com