
गुहागर तालुक्यातील देवघर येथे शॉर्टसर्किटमुळे घराला आग.
गुहागर तालुक्यातील देवघर-चव्हाणवाडी येथील संतोष चव्हाण यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील सर्व साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. चव्हाण हे या घरी रहात नसल्याने मोठी दुर्घटना टळली. बुधवारी पहाटे आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.देवघर येथील चव्हाण यांच्या घरातून बुधवारी पहाटे मोठ्या प्रमाणात धूर दिसून आला. यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. चव्हाण हे व्यवसायानिमित्त चिपळूण येथे रहात असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान या घराच्या नुकसानीचा पंचनामा तेथील तलाठी ज्योतील मुधीराज यांनी बुधवारी सायंकाळी केला.www.konkantoday.com