
सुकतळे या ठिकाणी दोन मगरी कोणत्याही वेळी पाण्याबाहेर येत असल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली
दोन-तीन दिवसापासून सुकतळे येथे मगरींचा वावर वावर वाढला आहे. यामुळे नजीकच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागासह वन्यजीव बचाव पथकाने मगरींना पकडण्यासाठी केलेले बचावकार्य फोल ठरले.यामुळे मगरींना पकडण्यासाठी पिंजरा लावण्यातआला आहेसुकतळे या ठिकाणी दोन मगरी कोणत्याही वेळी पाण्याबाहेर येत असल्याने नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. याबाबत वनविभागास कळवल्यानंतर बचावकार्यही हाती घेण्यात आले. मात्र दोन्ही मगरी पुन्हा पाण्यात गेल्यामुळे अडथळाच निर्माण झाला. शुक्रवारी मगरीने एका कुत्र्यावर हल्लाही चढवला. वनविभागाच्या पथकासह बचाव पथकाने बाहेर येणाऱ्या मगरींवर सुकतळ्यामध्ये दोन मगरींचा करडी नजर ठेवली आहे.त्या करिता दोन पिंजरे लावण्यात आले आहेत