कोकण रेल्वे मार्गावरील नागपूर-मडगाव रेल्वेला मुदतवाढ

कोकण मार्गावर विदर्भातून धावणाऱ्या नागपूर-मडगाव स्पेशल गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मागणीनुसार रेल्वे प्रशासनाने या विशेष गाडीला २९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. २९ पर्यंत या गाडीच्या ५२ फेऱ्या धावणार आहेत.

आठवड्यातून दर बुधवार व शनिवारी आणि परतीच्या प्रवासात मंगळवार व रविवारी धावणारी ही विशेष गाडी कोकणातील प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. नागपूर- विदर्भातील प्रवाशांसाठी ही गाडी – किफायतशीर ठरत असल्याने प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद लक्षात घेत या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ०११३९ नागपूर-मडगाव विशेष गाडीच्या २९ डिसेंबरपर्यंत २६ तर परतीच्या प्रवासातही २६ फेऱ्या धावणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button