
इचलकरंजीतही शरद पवारांची भर पावसात सभा.
शरद पवारांची साताऱ्यातली भर पावसातली सभा त्यांचे चाहते आणि महाराष्ट्रातली जनता अजूनही विसरलेली नाही. त्याच सभेची आठवण आज इचलकरंजीकरांना झाली.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवारांचे भाषण सुरु होताच पावसालाही सुरुवात झाली, शरद पवारांनी पावसातच आपलं भाषण सुरु ठेवलं.ते म्हणाले की अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाची सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो. यावर कार्यकर्त्यांनी शिट्ट्या वाजवून घोषणा दिल्या.